छत्रपती संभाजीनगर -हजारो गणेश भक्तांनी केले महाअथर्वशीर्ष पठण…
प्रत्येकावर आधात्माचे संस्कार व्हावेत आणि भाव भक्तीतून आपुलकीची ऊर्जा निर्माण व्हावी या हेतूने श्री गणेश महासंघ उत्सव समिती आणि वरद गणेश मंदिर ट्रस्ट च्या वतीने गुरुवारी (दि. २८) समर्थ नगर येथील वरद गणेश मंदिरात सकाळी ७ ते ८ वाजेदरम्यान श्री गणेश भक्तांच्या सहभागाने “अथर्वशीर्ष महापठण” घेण्यात आले. यामध्ये हजारो विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिकांनी आपला सहभाग नोंदवून हा उपक्रम यशस्वी केला. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने यंदाचा श्री गणेशोत्सव विविध समाजाभिमुख उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असून “नशामुक्त” छत्रपती संभाजीनगर हा संकल्प घेऊन विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात येणार असल्याची माहिती श्री गणेश महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत निल्लावार यांनी दिली. यावेळी भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे, वरद गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनील खोचे, दैनिक सकाळ चे युनिट हेड संजय चिकटे, सुशील भारूका, विश्व हिंदू परिषदेचे राजू जहागीरदार, अरविंद तेलवाडकर, श्री गणेश महासंघाचे प्रसिद्धी प्रमुख सचिन लिला सुखदेव अंभोरे, शिवा ठाकरे, फैजान शेख, सुरेंद्र खैरनार यांची उपस्थिती होती. या उपक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समिती, विश्व हिंदू परिषद मंदिर अर्चक पुरोहित आयाम, वरद गणेश मंदिर, केशव माधव चतुर्वेद पाठशाळा, आणि पतंजली योग परिवार, वाळूज, बजाजनगर यांनी पुढाकार घेतला. *चौकट...* *मराठवाड्यातील सर्वात मोठी ढोल-ताशा वादन स्पर्धा उद्या* गणेशोत्सवाची ओळख असलेली आणि आपली संस्कृती अभिव्यक्ती करणारी मराठवाड्यातील सर्वात मोठी ढोल-ताशा वादन स्पर्धा शनिवारी (दि. ३०) प्रोझोन मॉल च्या हिरवळीवर, सकाळी ९ वाजता रंगणार असून सुखकर्ता, विघ्नहर्ता गणरायाला ढोल-ताशांची गगनभेदी सलामी देण्यात येणार असल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत निल्लावार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. या ढोल-ताशा वादन स्पर्धेसाठी अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान, महाकाल हे पुढाकार घेत असून विजेत्या ढोल पथकास अनुक्रमे प्रथम, द्वितीय, trutiyआणि उत्तेजनार्थ असे पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेठी ३५ हुन अधिक ढोल पथकांनी आपली नावनोंदणी केली असून सर्व गणेश भक्तांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री गणेश महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत निल्लावार यांनी केले आहे. *सचिन लिला सुखदेव अंभोरे* प्रसिद्ध प्रमुख छत्रपती संभाजी नगर जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समिती-२०२५-२६

हजारो गणेश भक्तांनी केले महाअथर्वशीर्ष पठण…
*छत्रपती संभाजीनगर | दि. २८ :* प्रत्येकावर आधात्माचे संस्कार व्हावेत आणि भाव भक्तीतून आपुलकीची ऊर्जा निर्माण व्हावी या हेतूने श्री गणेश महासंघ उत्सव समिती आणि वरद गणेश मंदिर ट्रस्ट च्या वतीने गुरुवारी (दि. २८) समर्थ नगर येथील वरद गणेश मंदिरात सकाळी ७ ते ८ वाजेदरम्यान श्री गणेश भक्तांच्या सहभागाने “अथर्वशीर्ष महापठण” घेण्यात आले. यामध्ये हजारो विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिकांनी आपला सहभाग नोंदवून हा उपक्रम यशस्वी केला.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने यंदाचा श्री गणेशोत्सव विविध समाजाभिमुख उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असून “नशामुक्त” छत्रपती संभाजीनगर हा संकल्प घेऊन विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात येणार असल्याची माहिती श्री गणेश महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत निल्लावार यांनी दिली. यावेळी भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे, वरद गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनील खोचे, दैनिक सकाळ चे युनिट हेड संजय चिकटे, सुशील भारूका, विश्व हिंदू परिषदेचे राजू जहागीरदार, अरविंद तेलवाडकर, श्री गणेश महासंघाचे प्रसिद्धी प्रमुख सचिन लिला सुखदेव अंभोरे, शिवा ठाकरे, फैजान शेख, सुरेंद्र खैरनार यांची उपस्थिती होती. या उपक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समिती, विश्व हिंदू परिषद मंदिर अर्चक पुरोहित आयाम, वरद गणेश मंदिर, केशव माधव चतुर्वेद पाठशाळा, आणि पतंजली योग परिवार, वाळूज, बजाजनगर यांनी पुढाकार घेतला.
*चौकट…*
*मराठवाड्यातील सर्वात मोठी ढोल-ताशा वादन स्पर्धा उद्या*
गणेशोत्सवाची ओळख असलेली आणि आपली संस्कृती अभिव्यक्ती करणारी मराठवाड्यातील सर्वात मोठी ढोल-ताशा वादन स्पर्धा शनिवारी (दि. ३०) प्रोझोन मॉल च्या हिरवळीवर, सकाळी ९ वाजता रंगणार असून सुखकर्ता, विघ्नहर्ता गणरायाला ढोल-ताशांची गगनभेदी सलामी देण्यात येणार असल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत निल्लावार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
या ढोल-ताशा वादन स्पर्धेसाठी अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान, महाकाल हे पुढाकार घेत असून विजेत्या ढोल पथकास अनुक्रमे प्रथम, द्वितीय, trutiyआणि उत्तेजनार्थ असे पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेठी ३५ हुन अधिक ढोल पथकांनी आपली नावनोंदणी केली असून सर्व गणेश भक्तांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री गणेश महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत निल्लावार यांनी केले आहे.