छत्रपती संभाजीनगर -उत्सव नव्हे तर दायित्व म्हणून वाढदिवस नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा छ.संभाजीनगर शहरातील 1448 रक्तदात्यांनी केले रक्तदान
महाराष्ट्र राज्याचे विकासाभामुख भक्कम मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस उत्सव म्हणून नव्हे तर दायित्व म्हणून सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला. यामध्ये शहरातील 11 मंडळात 15 ठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. यामध्ये 1448 रक्तदात्यांनी रक्तदान करून त्यांना वाढदिवस नाविन्यपूर्ण रित्या भेट दिली. सदरील रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी कॅबिनेट मंत्री अतुल सावे, खासदार डॉक्टर भागवत कराड,

उत्सव नव्हे तर दायित्व म्हणून वाढदिवस नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा
छ.संभाजीनगर शहरातील 1448 रक्तदात्यांनी केले रक्तदान
प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे विकासाभामुख भक्कम मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस उत्सव म्हणून नव्हे तर दायित्व म्हणून सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला. यामध्ये शहरातील 11 मंडळात 15 ठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. यामध्ये 1448 रक्तदात्यांनी रक्तदान करून त्यांना वाढदिवस नाविन्यपूर्ण रित्या भेट दिली.
सदरील रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी कॅबिनेट मंत्री अतुल सावे, खासदार डॉक्टर भागवत कराड, विधानपरिषद आमदार संजय केणेकर यांनी योग्य पद्धतीने नियोजन करत संघटनात्मक ताकद अधिक वाढवली. याबद्दल शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी त्यांचे आभार व्यक्त करत आपल्या सर्वांच्या संघटनात्मक कार्याचा हा लाभ असल्याने आभार व्यक्त केले. या उपक्रमास त्यांच्यासोबत प्रदेश पदाधिकारी, शहर पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष यांच्यासह मोठ्याप्रमाणात पदाधिकाऱ्यांसह मान्यवर नागरिकांनी सहकार्य करीत हे अभियान यशस्वी केले.
*या ठिकाणी झाले रक्तदान शिबीर*
1) फुलंब्री विधानसभेतील , चिकलठाणा मंडळात …. 42
2) पुर्व विधानसभेतील, सिडको मंडळात…. 100,
3) पुर्व विधानसभेतील , गारखेडा मंडळात…… 178
4) पुर्व विधानसभेतील , कैलास नगर , मंडळात….. 43
5) मध्य विधानसभेतील , हडको मंडळात…. 56
6) मध्य विधानसभेतील, गुलमंडी मंडळात….. 105,
7) मध्य विधानसभेतील, बेगमपुरा मंडळात….. 43
8) पश्चिम विधानसभेतील, क्रांतीचौक मंडळात…. 81,
9) पश्चिम विधानसभेतील, पदमपुरा मंडळात….. 30,
10) पश्चिम विधानसभेतील , छावणी पडेगाव मंडळात…… 43,
11) पश्चिम विधानसभेतील, सातारा-देवळाई मंडळ येथील श्रेयश इंजिनीअरिंग काॅलेज येथे 524,
12) पश्चिम विधानसभेतील सातारा-देवळाई मंडळात आयप्पा मंदिर समोर मारुती मंदिर येथे 11,
13 ) पश्चिम विधानसभेतील सातारा-देवळाई मंडळात मारुती मंदिर विटखेडा पैठण रोड येथे 12
14) पश्चिम विधानसभेतील सातारा-देवळाई मंडळात हिमालया रेसिडन्सी खडी रोड येथे 10
15 ) पश्चिम विधानसभेतील सातारा-देवळाई मंडळात पवनपुत्र हनुमान मंदिर हेडगेवार हाॅस्पिटल जवळ 63, असे एकूण 1448 रक्त पिशवी संकलन झाले.