छत्रपती संभाजीनगर-मा. जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर श्री दिलीप स्वामी यांची गंगापुर प्रकल्प अंतर्गत वाळुज येथे सुरू असलेल्या सेविकांच्या तिन दिवसीय पोषण भी पढाई
बालविकास प्रकल्प अधिकारी गंगापुर या कार्यालयांतर्गत वाळुज बीट मधील गरवारे कम्युनिटी सेंटर येथे माननीय जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॅा. श्रीमती मंगल पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापुर तालुक्यातील सेविकांचे *पोषण भी पढाई भी* चे दुसऱ्या टप्प्याचे प्रशिक्षण सुरू आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या आठव्या राष्ट्रीय पोषण महा कार्यक्रम च्या अनुषंगाने पोषण आहार प्रदर्शन भरविण्यात आले व पोषण माह मध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे प्रातिनिधिक सादरीकरण मा. जिल्हाधिकारी यांचे समोर करण्यात

मा. जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर श्री दिलीप स्वामी यांची गंगापुर प्रकल्प अंतर्गत वाळुज येथे सुरू असलेल्या सेविकांच्या तिन दिवसीय पोषण भी पढाई भी प्रशिक्षणास आज दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी भेट तसेच आठवा राष्ट्रीय पोषण महा कार्यक्रम साजरा*
*************************
*छत्रपती संभाजीनगर* – बालविकास प्रकल्प अधिकारी गंगापुर या कार्यालयांतर्गत वाळुज बीट मधील गरवारे कम्युनिटी सेंटर येथे माननीय जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॅा. श्रीमती मंगल पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापुर तालुक्यातील सेविकांचे *पोषण भी पढाई भी* चे दुसऱ्या टप्प्याचे प्रशिक्षण सुरू आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या आठव्या राष्ट्रीय पोषण महा कार्यक्रम च्या अनुषंगाने पोषण आहार प्रदर्शन भरविण्यात आले व पोषण माह मध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे प्रातिनिधिक सादरीकरण मा. जिल्हाधिकारी यांचे समोर करण्यात आले.
वाळुज बीट मधील सेविका श्रीमती स्वाती खडके, सुरेखा भुजंग यांनी पोषण गीत सादर केले. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी स्थानिक उपलब्ध साहित्यातुन पोषण पाकक्रुती बनवुन आणल्या .या आहार प्रदर्शनास मा जिल्हाधिकारी व मा जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी भेट दिली.यावेळी वाळुज बिट अंतर्गत सेविका शिल्पा गवांदे, आशा देसाईं , सुरेखा भुजंग, योगीता शेट्टे, सविता चव्हाण, स्वाती खडके यांनी बेटी बचाव बेटी पढाव या थीम वर आधारीत पथनाट्य सादर केले. कार्यक्रमास वाळुज ग्रामपंचायत सरपंच श्रीमती सईदा भाभी यांचीउपस्थिती होती .त्यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कामकाजाची प्रशंसा केली.
कार्यालयाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती कल्पना देशमुख यांनी प्रास्तविक केले यात त्यांनी पोषण भी पढाई भी प्रशिक्षण बाबत सांगितले.यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॅा मंगल पांचाळ यांनी यांनी सन 2025 पोषण माह थीम नुसार जेवणामध्ये त्रुणधान्याचा जास्तीत जास्त करणे, पारंपरिक पाककृतींचा योग्य वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच पोषण भी पढाई भी प्रशिक्षण कसे महत्वाचे आहे हे सांगितले. यावेळी मा जिल्हाधिकारी यांनी बोलताना बालकांची काळजी व संगोपन, कुपोषण निर्मूलनाबाबत उपाययोजना इत्यादी बाबत मार्गदर्शन केले. तसेच याकरिता विविध खात्यांचा समन्वय जिल्हाधिकारी कार्यालयातून मीळेल असे सांगितले. यावेळी मा जिल्हाधिकारी यांनी अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या कामाचे व आयोजीत पोषण आहाराचे कौतुक केले.
कार्यालयाच्या पर्यवेक्षीका श्रीमती रिता शिंदे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.
यावेळी प्रकल्प अधिकारी श्री गोविंद अंधारे, वाळुज येथील ग्रामविकास अधिकारी श्री भोंडवे, व कार्यालयातील सर्व पर्यवेक्षीका या ऊपस्थित होत्या.