छत्रपती संभाजीनगर -लाल बावटा शेतमजूर युनियनचे धरणे आन्दोलन • गायरान धारकाना अतिवृष्टीग्रस्तांची नुकसान भरपाई दया. • अदानीला लिजवर जमीन.आम्हालाही ५० वर्षाच्या लिजवर दया. • अदानीपेक्षा १०० पटीने जास्त भाडे देण्यास गायरानधारक तयार,
नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे करून मदत देणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे.या पार्श्वभूमीवर गायरान जमीन व त्यातील पिके,घरे ,जनावरे आदीचे नुकसान झालेल्या गायरान धारकाना देखील कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता एकरी ७० हजार रुपये प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी ही मागणी करण्यात आली. तसेच अदानी व इतर भांडवलदाराना ज्याप्रमाणे उद्योगासाठी प्रतिवर्ष प्रती एकर १ रुपये लीजवर शासकीय जमिनी दिल्या जातात त्याप्रमाणे गायरान जमीन धारकांनाही ५० वर्षाच्या भाडे तत्वावर दरवर्षी एकरी १०० रुपये दराप्रमाणे कसण्यासाठी लीजवर जमिनी दया या प्रमुक्ख मागण्यासाठी आज भारतीय खेत मजदूर युनियन (BKMU) शी सलंग्न असलेल्या राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीने जिल्ल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निवासी जिल्हाधिकारी श्री.विधाते यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात करण्यात आलेल्या इतर मागण्या - कलेक्टरचे दि.१७ जुलै २०२५ चे परिपत्रक तातडीने रद्द करावे व गायरान धारकामध्ये पसरलेली दहशत दूर करावी ,१९९१ च्या जीआर मधील तारीख बदलून आजपर्यंतची सर्व अतिक्रमणे नियमित

लाल बावटा शेतमजूर युनियनचे धरणे आन्दोलन
• गायरान धारकाना अतिवृष्टीग्रस्तांची नुकसान भरपाई दया.
• अदानीला लिजवर जमीन.आम्हालाही ५० वर्षाच्या लिजवर दया.
• अदानीपेक्षा १०० पटीने जास्त भाडे देण्यास गायरानधारक तयार,
छत्रपती संभाजी नगर दि.६: अतिवृष्टीमुळे ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे करून मदत देणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे.या पार्श्वभूमीवर गायरान जमीन व त्यातील पिके,घरे ,जनावरे आदीचे नुकसान झालेल्या गायरान धारकाना देखील कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता एकरी ७० हजार रुपये प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी ही मागणी करण्यात आली. तसेच अदानी व इतर भांडवलदाराना ज्याप्रमाणे उद्योगासाठी प्रतिवर्ष प्रती एकर १ रुपये लीजवर शासकीय जमिनी दिल्या जातात त्याप्रमाणे गायरान जमीन धारकांनाही ५० वर्षाच्या भाडे तत्वावर दरवर्षी एकरी १०० रुपये दराप्रमाणे कसण्यासाठी लीजवर जमिनी दया या प्रमुक्ख मागण्यासाठी आज भारतीय खेत मजदूर युनियन (BKMU) शी सलंग्न असलेल्या राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीने जिल्ल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निवासी जिल्हाधिकारी श्री.विधाते यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात करण्यात आलेल्या इतर मागण्या – कलेक्टरचे दि.१७ जुलै २०२५ चे परिपत्रक तातडीने रद्द करावे व गायरान धारकामध्ये पसरलेली दहशत दूर करावी ,१९९१ च्या जीआर मधील तारीख बदलून आजपर्यंतची सर्व अतिक्रमणे नियमित

करा,सौर उर्जा व विकासाचे प्रकल्प गायरानात राबऊ नका,मंजूर झालेली घरकुले बांधण्यासाठी गावठाणात किंवा गायरानात जागा दया,कर्मवीर दादासाहेब गायकवाड भूमीहीन स्वाभिमान योजनेत योग्य ते बदल करून सर्व भूमीहीनांना त्याअंतर्गत जमीनी द्या.
आजच्या आंदोलनात लाल बावटा शेतमजूर युनियनचे जिल्हा अध्यक्ष कॉ.प्रा.राम बाहेती,जिल्हा सचिव कॉ.गणेश कसबे,भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव कॉ.अभय टाकसाळ,कॉ.मधुकर खिल्लारे,किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉ.अशोक जाधव,गंगापूर तालुका शेतमजूर युनियनचे अध्यक्ष कॉ.हरिभाऊ हाटकर कॉ.संतोष काळे,कॉ.शेख नूर,कॉ.गणेश सुसे,सुभाष बत्तीसे, उत्तम बात्तीशे,सखुबाई साबळे, कामान्बाई जाधव ,कोकिला आव्हाड, कॉ.रुख्मण श्रीखंडे,रघुजी खंडागळे,नरसिंगग कोकाटे, काशिनाथ कुकलारे,बबन बोराडे,हलीम शेख,कमाल तिन्गोते,एकनाथ सुसे ,शेख हुसैन,मीनाबाई पवार,सलीम सयाद,आसाराम गाढे,योगेश सुसे,नवनाथ साळवे,संजय वाघकसं सरदार शेख आदेश १०० ते १५० गायरानधारक सहभागी झाले होते.
कॉ.प्रा.राम बाहेती-जिल्हा अध्यक्ष कॉ.गणेश कसबे-जिल्हा सचिव