छत्रपती संभाजीनगर -आगळ्यावेगळ्या पद्धतीने केला माननीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांचा वाढदिवस साजरा
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आरोग्य विभागाचे माननीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांचा वाढदिवस अत्यंत उत्साही वातावरणात आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या खास दिवशी श्री.प्रदीप जैन यांनी जैन गोशाळा चिकलठाणा येथील गोमतांना खाद्य व चारा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तेथे डॉ.पारस मंडलेचा यांनी स्वहस्ते गोमतांना हिरवा चारा

⸻
आगळ्यावेगळ्या पद्धतीने केला माननीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांचा वाढदिवस साजरा
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आरोग्य विभागाचे माननीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांचा वाढदिवस अत्यंत उत्साही वातावरणात आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
या खास दिवशी श्री.प्रदीप जैन यांनी जैन गोशाळा चिकलठाणा येथील गोमतांना खाद्य व चारा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तेथे डॉ.पारस मंडलेचा यांनी स्वहस्ते गोमतांना हिरवा चारा खाऊ घातला तसेच बाबा साई एड्स ग्रस्त आश्रम येथे आयोजित अन्नदानाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तेथील बालकांना व कर्मचारी सर्वांना पिझ्झा देण्यात आला.
डॉ.पारस मंडलेचा यांनी गोमातांना खाद्यदान करून आपला सामाजिक भान जपत एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी तिथे प्रदीप जैन (आयोजक), डॉ. कविता मंडलेचा, मंगला धमाळे, निशा जैन,पार्थ जैन, अवनीश जैन ,संतोष साळवे, राहुल शिंदे, प्रेम शेजवळ, रोहित मगरे, विजय शेजवळ, अनिल साळवे, आकाश जगताप, प्रकाश वकळे,फैजान पठाण, सूरज कांबळे, दीपक तुपे, गौरव श्रीसुंदर, असलम पठाण, रिहान पठाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
तसेच या दिवशी आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार व्यक्त केले.
डॉ. मंडलेचा हे त्यांच्या कार्यतत्परतेसाठी, शिस्तप्रियतेसाठी व सामाजिक बांधिलकीसाठी प्रसिद्ध असून, त्यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागात अनेक सकारात्मक उपक्रम राबवले जात आहेत.