छत्रपती संभाजीनगर -शिवसैनिकांना जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असायला हवी,शिवसेना नेते – विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र
शिवसैनिकांना जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असायला हवी, यामुळेच संघटनात्मक बांधणीसाठी योग्य धोरण तयार करता येत असल्याचा कानमंत्र शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला. कन्नड तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या
*शिवसैनिकांना जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असायला हवी*
*शिवसेना नेते – विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र*
कन्नड : शिवसैनिकांना जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असायला हवी, यामुळेच संघटनात्मक बांधणीसाठी योग्य धोरण तयार करता येत असल्याचा कानमंत्र शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला. कन्नड तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हतनूर येथे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज २ ऑगस्ट रोजी बैठक संपन्न झाली.
तालुक्यातील देवगांव रंगारी, चापानेर, जेहुर, व अंधानेर जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. सदरील बैठकीत विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यात निर्माण झालेल्या राजकीय स्थितीची माहिती दानवे यांनी घेतली.
याप्रसंगी माजी आमदार उदयसिंग राजपूत, किसानसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब मोहिते, तालुकाप्रमुख संजय मोटे, विधानसभा संघटक डॉ. अण्णासाहेब शिंदे, गीताराम पवार, दिलीप मुठ्ठे, गणेश शिंदे, दीपक बोडखे, गोकुळ गोरे,महिला आघाडी तालुका संघटक रूपालीताई मोहिते व तालुकाधिकारी योगेश पवार उपस्थित होते.