छत्रपती संभाजीनगर -श्री गणेश मूर्तीच्या विक्रीतून उमेद स्वयंसहायता समूहातील महिलांनी मिळवले 6 कोटी 93 लक्ष
गणेशोत्सव 2025 उमेद स्वयं सहायता समूहातील महिलांची आर्थिक स्थिती सुधारावी या उद्देशाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक श्री अंकित सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेश मूर्ती विक्रीसाठी ग्राम ,तालुका व जिल्हा पातळीवर एकूण २४६ स्टॉल उभारण्यात आले होते या स्टॉल मधून २ लक्ष, ४५ हजार, ४९७ श्री गणेश मूर्तीची विक्री करण्यात आली असून या माध्यमातून ६ कोटी, ९३ लक्ष, ४२ हजार, ७३१ रुपये रक्कम जमा झाली छत्रपती संभाजीनगर जि प मैदान ६१ लक्ष ३२ हजार ८७९ रुपये, छत्रपती संभाजी नगर तालुका – ६३ लक्ष ४१ हजार २८५ रुपये, गंगापूर – ८० लक्ष, ९९ हजार ७९५ रुपये, कन्नड – ८३ लक्ष ९७ हजार ६२० रुपये, खुलताबाद - ४४ लक्ष ४२ हजार ८६५ रुपये , पैठण – ७६ लक्ष ७१ हजार २६२ रुपये, फुलंब्री- २९ लक्ष ०९ हजार ९३६ रुपये, सिल्लोड – १ कोटी २९ लक्ष ४७ हजार ७४० रुपये, सोयगाव- २७ लक्ष १६ हजार ७०९ रुपये, वैजापूर- ९६ लक्ष ८२ हजार ६४० रुपये असे एकूण ६ कोटी ९३ लक्ष ४२ हजार ७३१ रुपये रक्कम जमा झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी श्री गणेश मूर्तीची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात आली आहे याबद्दल स्वयंसहायता समूहातील महिलांचे कौतुक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांनी केले. विक्रीसाठी ग्राम तालुका व जिल्हा पातळीवर उभारण्यात आलेल्या स्टॉलसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पातळीवर गट विकास अधिकारी जिल्हा पातळीवर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे यांनी संपूर्ण यंत्रणेवर श्री गणेश मूर्ती विक्रीसाठी नियोजन केले. सहायक प्रकल्प संचालक उल्हास खळेगावकर, जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सरगर, जिल्हा व्यवस्थापक विपणन सचिन सोनवणे, जिल्हा

श्री गणेश मूर्तीच्या विक्रीतून उमेद स्वयंसहायता समूहातील महिलांनी मिळवले 6 कोटी 93 लक्ष
*स्वयंसहायता समूहातील महिलांचे घवघवीत यश… गणेश मूर्तीच्या विक्रीतून मिळवले 6 कोटी 93 लक्ष*
*स्वयंसहायता समूहातील महिलांची भरारी… गणेश मूर्तीच्या विक्रीतून मिळवले 6 कोटी 93 लक्ष*
छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सव 2025 उमेद स्वयं सहायता समूहातील महिलांची आर्थिक स्थिती सुधारावी या उद्देशाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक श्री अंकित सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेश मूर्ती विक्रीसाठी ग्राम ,तालुका व जिल्हा पातळीवर एकूण २४६ स्टॉल उभारण्यात आले होते या स्टॉल मधून २ लक्ष, ४५ हजार, ४९७ श्री गणेश मूर्तीची विक्री करण्यात आली असून या माध्यमातून ६ कोटी, ९३ लक्ष, ४२ हजार, ७३१ रुपये रक्कम जमा झाली
छत्रपती संभाजीनगर जि प मैदान ६१ लक्ष ३२ हजार ८७९ रुपये, छत्रपती संभाजी नगर तालुका – ६३ लक्ष ४१ हजार २८५ रुपये, गंगापूर – ८० लक्ष, ९९ हजार ७९५ रुपये, कन्नड – ८३ लक्ष ९७ हजार ६२० रुपये, खुलताबाद – ४४ लक्ष ४२ हजार ८६५ रुपये , पैठण – ७६ लक्ष ७१ हजार २६२ रुपये, फुलंब्री- २९ लक्ष ०९ हजार ९३६ रुपये, सिल्लोड – १ कोटी २९ लक्ष ४७ हजार ७४० रुपये, सोयगाव- २७ लक्ष १६ हजार ७०९ रुपये, वैजापूर- ९६ लक्ष ८२ हजार ६४० रुपये असे एकूण ६ कोटी ९३ लक्ष ४२ हजार ७३१ रुपये रक्कम जमा झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी श्री गणेश मूर्तीची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात आली आहे याबद्दल स्वयंसहायता समूहातील महिलांचे कौतुक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांनी केले.
विक्रीसाठी ग्राम तालुका व जिल्हा पातळीवर उभारण्यात आलेल्या स्टॉलसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पातळीवर गट विकास अधिकारी जिल्हा पातळीवर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे यांनी संपूर्ण यंत्रणेवर श्री गणेश मूर्ती विक्रीसाठी नियोजन केले. सहायक प्रकल्प संचालक उल्हास खळेगावकर, जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सरगर, जिल्हा व्यवस्थापक विपणन सचिन सोनवणे, जिल्हा व्यवस्थापक बिभीषण भोईटे, जिल्हा व्यवस्थापक सुचिता खोतकर, जिल्हा व्यवस्थापक प्रज्ञा दाभाडे व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयातील जिल्हा व तालुका पातळीवरील सर्व तालुका अभियान व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी तसेच स्वयंसहायता समूहातील सर्व महिलांनी या कामी लक्ष देऊन उपक्रम यशस्वी केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक, अशोक सिरसे यांनी सर्व यंत्रणेचे कौतुक केले.