छत्रपती संभाजीनगर -TET प्रश्नावर शालेय शिक्षण मंत्र्यांशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची चर्चा मंत्री महोदयांनी दिले अनुकूल निर्णयार्थ निर्देश.
नामदार दादाजी भुसे शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांची शुक्रवार दि. 26 सप्टेंबर रोजी मालेगाव येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांचे नेतृत्वात TET संबंधाने भेट घेऊन राज्यातील लाखो शिक्षकांना संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने मुद्दे निहाय सविस्तर चर्चा करण्यात आली. पुनर्विलोकन याचिका दाखल करणे वा राज्य शासनाने पुढाकार घेऊन शिक्षकांना न्याय मिळण्यासाठी विधी व न्याय विभाग, शालेय शिक्षण स्तरावर चर्चा सुरू असून शिक्षक हिताचा निर्णय घेण्यासाठी शासन गंभीर असल्याचे मंत्री महोदयांनी स्पष्ट केले. यावेळी राज्य उपाध्यक्ष मा. आनंदादादा कांदळकर, राज्य कार्यकारिणी सदस्य संजय पगार, जिल्हाध्यक्ष प्रकाश अहिरे,जिल्हा नेते जिभाऊ बच्छाव,जिल्हा सरचिटणीस साहेबराव पवार,जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब पवार,जिल्हा उपाध्यक्ष मा.शिवाजीराजे शिंदे, सौंदाणे पतसंस्थेचे संचालक युवा नेतृत्व सुमित बच्छाव,मालेगाव तालुका शाखेचे अध्यक्ष प्रमोद बच्छाव,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनिल शिरसाठ यांचे सह नाशिक जिल्हा व तालुका शाखांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. TET संबंधाने 23 ऑगस्ट 2013 च्या शासन निर्णयास अनुसरून निर्णय व्हावा. TET संबंधाने राज्य शासनाने वेळोवेळी काढलेल्या शासन निर्णयाचा विचार प्राधान्याने झाला पाहिजे.

TET प्रश्नावर शालेय शिक्षण मंत्र्यांशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची चर्चा
मंत्री महोदयांनी दिले अनुकूल निर्णयार्थ निर्देश.
नामदार दादाजी भुसे शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांची शुक्रवार दि. 26 सप्टेंबर रोजी मालेगाव येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांचे नेतृत्वात TET संबंधाने भेट घेऊन राज्यातील लाखो शिक्षकांना संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने मुद्दे निहाय सविस्तर चर्चा करण्यात आली. पुनर्विलोकन याचिका दाखल करणे वा राज्य शासनाने पुढाकार घेऊन शिक्षकांना न्याय मिळण्यासाठी विधी व न्याय विभाग, शालेय शिक्षण स्तरावर चर्चा सुरू असून शिक्षक हिताचा निर्णय घेण्यासाठी शासन गंभीर असल्याचे मंत्री महोदयांनी स्पष्ट केले.
यावेळी राज्य उपाध्यक्ष मा. आनंदादादा कांदळकर, राज्य कार्यकारिणी सदस्य संजय पगार, जिल्हाध्यक्ष प्रकाश अहिरे,जिल्हा नेते जिभाऊ बच्छाव,जिल्हा सरचिटणीस साहेबराव पवार,जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब पवार,जिल्हा उपाध्यक्ष मा.शिवाजीराजे शिंदे, सौंदाणे पतसंस्थेचे संचालक युवा नेतृत्व सुमित बच्छाव,मालेगाव तालुका शाखेचे अध्यक्ष प्रमोद बच्छाव,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनिल शिरसाठ यांचे सह नाशिक जिल्हा व तालुका शाखांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
TET संबंधाने 23 ऑगस्ट 2013 च्या शासन निर्णयास अनुसरून निर्णय व्हावा. TET संबंधाने राज्य शासनाने वेळोवेळी काढलेल्या शासन निर्णयाचा विचार प्राधान्याने झाला पाहिजे.

प्रत्येक शिक्षक त्या-त्या काळातील आवश्यक अर्हता धारण करूनच सेवेत आले आहे. त्यामळे शासनाने न्यायसंगत भूमिका घेतली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी मांडली.
तसेच यावर्षीची संचमान्यता अंतिम करण्यास मुदतवाढ मिळावी. पेसा-नॉन पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षकांच्या मानधनासाठी अनुदान मिळावे. यासाठी सुद्धा विनंती करण्यात आली. शिक्षक समितीच्या निवेदनावर मंत्री महोदयांनी अनुकूल निर्णयार्थ निर्देश दिले असल्याचे शिक्षक समितीचे मराठवाडा विभागीय प्रसिध्दीप्रमुख सतीश कोळी यांनी सांगितले.