छत्रपती संभाजीनगर -लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीने गायरान धारकांचे धरणे आंदोलन.कलेक्टरच्या आदेशाची होळी!
अतिक्रमण केलेल्या सरकारी पडीक व गायरान जमीनीचे सर्वेक्षण करण्याचे व टप्प्या टप्प्याने ही अतिक्रमणे काढून टाकण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी १७ जुलै रोजी काढलेल्या परिपत्रकात दिल्याने जिल्हाभरातील गायरान धारकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिपत्रकाच्या निषेधार्थ आज भारतीय खेत मजदूर युनियन (BKMU)शी संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात

लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीने गायरान धारकांचे धरणे आंदोलन.कलेक्टरच्या आदेशाची होळी!
– सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा
संदर्भ देणे चूक .
छत्रपती संभाजी नगर दि.२३: अतिक्रमण केलेल्या सरकारी पडीक व गायरान जमीनीचे सर्वेक्षण करण्याचे व टप्प्या टप्प्याने ही अतिक्रमणे काढून टाकण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी १७ जुलै रोजी काढलेल्या परिपत्रकात दिल्याने जिल्हाभरातील गायरान धारकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या परिपत्रकाच्या निषेधार्थ आज भारतीय खेत मजदूर युनियन (BKMU)शी संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले.
जिल्हाधिकारी यांच्या परिपत्रकाची होळीची यावेळी करण्यात आली.
या धरणे व निदर्शने आंदोलनात सुमारे १०० गायरान धारक सहभागी झाले होते.जिल्हाधिकारी स्वामी वेरूळ दौऱ्यावर असल्याने निवासी उपजिल्हाधिकारी फुलारी यांना निवेदन देण्यात आले.
२८ जुलैपासून आठवडाभर गायरान हक्क यात्रा
येत्या २८ जुलैपासून लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीने गायराध हक्क यात्रा वाळुंज पासून सुरू करण्यात येणार आहे. क्रांतिसिंह कॉम्रेड नाना पाटील यांच्या जयंती दिनी ३ ऑगस्ट रोजी यांचा समारोप फुलंब्री तालुक्यातील वाहेगाव येथे होणार आहे.
१५ आॉगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा.
गायरान हक्क यात्रा काढल्यानंतर स्वातंत्र्य दिनी विभागीय आयुक्त कार्यालयावर लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीने हजारो गायरान धारक मोर्चा काढतील असा इशारा आज निवासी उपजिल्हाधिकारी श्री.फुलारी यांना निवेदन देऊन चर्चा करताना देण्यात आला.
खालील मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
१) सर्वोच्च न्यायालयाने 2011 साली दिलेल्या निकालातील परिच्छेद क्र.२२ मधील निर्देशाकडे शासनाचे व प्रशासनाचे दुर्लक्ष करू नये.
२) जिल्हाधिकाऱ्यांचे प दि.१७ जुलै २०२५ चे परिपत्रक तातडीने रद्द करावे.
३) सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा धनदांडग्यानी केलेल्या अतिक्रमणासंदर्भात असल्याने गायरान जमीन कसून उदरनिर्वाह करणाऱ्या व छोटीसी घरे बांधून राहणाऱ्या अतिक्रमित धारकावर अन्याय करू नये.
४) १९९० च्या जीआर मधील तारीख बदलून आजपर्यंतची सर्व अतिक्रमणे
नियमित करावीत.
५) गायरान जमीन कसणाऱ्या सर्व भूमीहीनाच्या नावावर पट्टे करा.
६ ) सौर उर्जा व विकासाचे प्रकल्प गायरानात राबू नका.
७ ) घरकुल धारक गायरान धारकांना घरांचा मालकी हक्क दया.
८ ) कर्मवीर दादासाहेब गायकवाड भूमीहीन स्वाभिमान योजनेत योग्य ते बदल करून सर्व भूमीहीनांना त्याअंतर्गत जमीनी द्या
लाल बावटा शेतमजूर युनियनचे अध्यक्ष कॉ. राम बाहेती, सचिव कॉ. गणेश कसबे, जिल्हा उपाध्यक्ष कॉ.मिर्झा असलम, कॉ.गणेश सुसे,कॉ. संतोष काळे, कॉ.शेख नूर, कॉ.पोपट कुऱ्हाडे,कॉ.संजय तावरे, कॉ. नरसिंग कोकाटे कॉ.हरिभाऊ हाटकर,
कॉ.गयाबाई सोनवणे,
कॉ.रुखमण श्रीखंडे , कॉ.काशीनाथ कुकलारे ,कॉ.संतोष कसबे,राजू साठे, रघुनाथ खंडागळे, संतोष मोरे आदीसह सुमारे १०० ते सव्वाशे गायरान धारक यावेळी उपस्थित होते.
गावरान हक्क यात्रा, स्वातंत्र्य दिनी मोर्चा, पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर निदर्शने आदी माध्यमातून आंदोलन तीव्र केले जाईलच. त्यासोबतच सर्वोच्च न्यायालयातही दाद मागण्याचा निर्णय आज झालेल्या तातडीच्या बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी गुरू धानोरा चे कॉ.गणेश सुसे होते.
राम बाहेती, जिल्हा अध्यक्ष
गणेश कसबे, जिल्हा सचिव