महत्वाचे

अकोला. उरळ पोलीस स्टेशनची केलेली कारवाई,दरोडयाच्या गुन्हयातिल अज्ञात आरोपिंचा शोध घेवून गुन्हा केला

कसुरा रोडवरील गणपती मंदिराजवळ दोन मोटारसायकलवर ४ अज्ञात इसम हे आले व त्यांनी फिर्यादीला थांबवून त्याला चाकूवा धाक दाखवून त्याच्या हातातील दोन चांदीच्या अंगठया मोबाईल व बजाज पल्सर मोटारसायकल क्रमांक एमएच-३०बिटी-९२३८ असा एकूण ७०,०००/रू वा मुददेमाल जबदरस्ती घेवून पळून गेले. अशा रिपोट वरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासामध्ये मिळालेल्या गोपनिय माहितीवरून

जि.अकोला.
उरळ पोलीस स्टेशनची केलेली कारवाई

अपराध नं.:-१९३/२०२५ कलम ३०९ (४), ३१० (२) बी.एन.एस. मधील दरोडयाच्या गुन्हयातिल अज्ञात आरोपिंचा शोध घेवून गुन्हा केला उघड ३ आरोपि अटक व ३ अल्पवयीन आरोपिंचा सहभाग उघड १,४१,०९०/रू चा मुददेमाल जप्त

दिनांक ११/०६/२०२५ रोजी चे रात्री ०३.०० वा दरम्यान फिर्यादी नामे मयुर सदाशिव मालठणकर, रा. मनारखेड ता. बाळापुर जि अकोला हे त्यांचे काम आटापून कसुरा रोडने मनारखेड कडे मोटारसायकलने जात असताना, कसुरा रोडवरील गणपती मंदिराजवळ दोन मोटारसायकलवर ४ अज्ञात इसम हे आले व त्यांनी फिर्यादीला थांबवून त्याला चाकूवा धाक दाखवून त्याच्या हातातील दोन चांदीच्या अंगठया मोबाईल व बजाज पल्सर मोटारसायकल क्रमांक एमएच-३०बिटी-९२३८ असा एकूण ७०,०००/रू वा मुददेमाल जबदरस्ती घेवून पळून गेले. अशा रिपोट वरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

तपासामध्ये मिळालेल्या गोपनिय माहितीवरूनकसुरा रोडवरील गणपती मंदिराजवळ दोन मोटारसायकलवर ४ अज्ञात इसम हे आले व त्यांनी फिर्यादीला थांबवून त्याला चाकूवा धाक दाखवून त्याच्या हातातील दोन चांदीच्या अंगठया मोबाईल व बजाज पल्सर मोटारसायकल क्रमांक एमएच-३०बिटी-९२३८ असा एकूण ७०,०००/रू वा मुददेमाल जबदरस्ती घेवून पळून गेले. अशा रिपोट वरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

तपासामध्ये मिळालेल्या गोपनिय माहितीवरून ग्राम गुडधी ता. जि. अकोला येथील ५ ते ६ इसमांनी कसुरा रोडवर काही दिवसांपुर्वी अशाच प्रकारचे काम केले असल्याची माहितीवरून पोलीस टिम तेथे पाठवून तेथील इसम नामे चैतन्य दिनेश बोदडे वय १९ वर्ष रा. गुडधी यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता, सदर आरोपि याने तो आणी त्याचे साथिदार नामे यश श्रीकांत उमाळे, वय २३ वर्ष, रा. संजय नगर अकोला, सामेश्वर सुभाष लाखे, वय १८ वर्ष रा. गुडधी आणी ३ विधी संघर्ष बालक यांचे साथीने कसुरा रोडवर दि.११/०६/२०२५ रोजी चे रात्री एका इसमाला चाकुचा धाक दाखवून त्याची मोटारसायकल व चांदीच्या अंगठया व मोबाइल जबरदस्ती काढून नेल्याची कबूली दिली. वरून पोउपनि अरूण मुंढे व स्टाफ यांनी यातिल दुसरा आरोपि यश श्रिकांत उमाळे याला पारनेर ता. अंबड जि. जालना येथून ताब्यात घेउन अटक केली आहे. तसेच आरोपि नामे सोमेश्वर सुभाष लाखे याला हि ताब्यात घेवून अटक केली आहे. व तिन्ही आरोपिकडून गुन्हयात वापरलेले शस्त्र, तसेच जबरदस्ती चोरून नेलेली मोटारसायकल बजाज पल्सर क्रमांक एमएच-३०बिटी-९२३८ व फिर्यादीचा मोबाईल रियलमी कंपनिचा, २ चांदीच्या अंगठ्या जप्त केल्या आहेत. तसेच आरोपिची एक मोटारसायकल क्रमांक एमएच३०-बियु-४४७५ व १ मोबाईल पोको कंपनिचा असा एकुण १,४१,०९०/रू चा मुददेमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला आहे. तसेच पोलीस स्टेशन जुने शहर अकोला येथील अप क. ४१२/२०२५ कलम ३०९ (६) भारतिय न्याय संहिता वा गुन्हा केल्याची कबुली यातिल आरोपिंनी दिली आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. अर्चित चांडक साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. अभय डोंगरे साहेब, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. गजानन पडघन साहेब, मा. ठाणेदार श्री. अभिषेक अंधारे साहेब यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अरूण मुंढे, पोहेका. इम्मान खान, बनं ३७५, पोकॉ विकास राठोड बनं २२३५, पोकॉ संतोष गाढवे बनं १३१०, पोकॉ रमेश जाधव बनं ४१४ पोलीस स्टेशन उरळ जि. अकोला यांनी केली आहे.
विदर्भ संपादक
लक्ष्मण कान्हेरकर

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.