आयटकच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विराट मोर्चा. जनसुरक्षा विधेयकाचाही विरोध. अधिकारी मोर्चाला सामोरे आल्यानंतरच जि.प.गेटवर चढलेल्या महिला खाली उतरल्या!
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाच्या होणाऱ्या मानसिक व शारीरिक त्रासाच्या निषेधार्थ तसेच किमान वेतन व पेन्शनच्या थकीत मागणीसाठी आज आयटक प्रणित अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेवर विराट मोर्चा काढण्यात आला.मोर्चा जिल्हा परिषदेवर पोहचल्यावर संतप्त महिला कर्मचारी बंद करण्यात आलेल्या जि.प.गेटवर चढल्या व "गेट उघडा किंवा अधिकाऱ्यांना निवेदन घेण्यासाठी मोर्चा समोर बोलवा" असा आग्रह धरला. शेवटी महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीमती पांचाळ मॅडम मोर्चा समोर आल्या व त्यांनी निवेदन स्वीकारले.तसेच पुन्हा चर्चेसाठी त्यांच्या कक्षातही

आयटकच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विराट मोर्चा.
जनसुरक्षा विधेयकाचाही विरोध.
अधिकारी मोर्चाला सामोरे आल्यानंतरच जि.प.गेटवर चढलेल्या महिला खाली उतरल्या!
छ.संभाजी नगर दि.८: अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाच्या होणाऱ्या मानसिक व शारीरिक त्रासाच्या निषेधार्थ तसेच किमान वेतन व पेन्शनच्या थकीत मागणीसाठी आज आयटक प्रणित अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेवर विराट मोर्चा काढण्यात आला.मोर्चा जिल्हा परिषदेवर पोहचल्यावर संतप्त महिला कर्मचारी बंद करण्यात आलेल्या जि.प.गेटवर चढल्या व “गेट उघडा किंवा अधिकाऱ्यांना निवेदन घेण्यासाठी मोर्चा समोर बोलवा” असा आग्रह धरला. शेवटी महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीमती पांचाळ मॅडम मोर्चा समोर आल्या व त्यांनी निवेदन स्वीकारले.तसेच पुन्हा चर्चेसाठी त्यांच्या कक्षातही शिष्टमंडळास पाचारण केले.
लोकशाही मार्गाने मागण्यांसाठी संघर्ष करणाऱ्यांचे आंदोलन दडपून टाकण्यासाठी सरकार आणत असलेल्या जनविरोधी जन सुरक्षा विधेयका विरोधातही प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.खालील समस्याकडे जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले.
अंगणवाडी सेविकांना एफआर.एस च्या कामाचा सध्या प्रचंड त्रास होत आहे.अनेकदा पती किंवा मुलगा किंवा इतर नातेवाईक यांच्या मोबाईल वरून काम करण्याची सक्ती केली जाते. लाभार्थ्यांचे फेस रिकग्निशन पद्धतीमुळे मानसिक त्रास होत असल्याचे आयटकचे म्हणणे आहे.
अधिकाऱ्यांना देखील आपण द्यावेत असे आवाहनही आम्ही करत आहोत.
लाडक्या बहिण योजनेच्या लाभार्थ्याची पुनरतपासणी करण्याचे काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देणे हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे असेही निवेदनात म्हटले आहे.
निवडणुकी संदर्भातील कामे, मातृ वंदना कामाची सक्ती बंद करावी अशी मागणीही करण्यात आली.
जानेवारी २०२४ मधील संपकाळातील मानधन , किमान वेतन व पेन्शन या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले.
जिल्हा परिषद व महिला बाल विकास विभागांतर्गत रिक्त असणाऱ्या लिपिक,टंकलेखक,सहायक आदी तृतीय श्रेणी व चतुर्थ श्रेणीच्याही एकूण जागापैकी किमान १० टक्के जागा पात्र अंगणवाडी सेविका व मदतनीसामधून भराव्यात अशी मागणी करण्यात आली.
स्वत:च्या अंगणवाडी व्यतिरिक्त अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या सेविकेस/मदतनीसास अतिरिक्त भत्ता देण्यात यावा,आजपर्यंतची सर्व थकीत प्रवास भत्ता देयके अदा करावी,टीएचआर आहार बंद करावा, पर्यायी पोषण आहाराची व्यवस्था करावी,
मोबाईल रिचार्जची देयके अदा करावीत आदी मागण्या करण्यात आल्या.मुमताज पठाण या कन्नड तालुक्यातील निवृत कर्मचाऱ्याचा लाभाचा रु.७५०००/- चा धनादेश आज त्यांना तातडीने अदा करण्यात आला व इतर निवृत कर्मचाऱ्यांचेही लवकरच अदा करण्यात येईल असे पांचाळ मॅडम यांनी सांगितले.
आजच्या मोर्चाचे नेतृत्व आयटक युनियनचे जिल्हाध्यक्ष कॉ.प्रा.राम बाहेती,विलास शेंगुळे, शालिनी पगारे,मीरा अडसरे, संगीता अंभोरे, चंचल खंडागळे,गीता पांडे, अभय टाकसाळ, अनिता हिवराळे,मनीषा भोळे, सरला कदम,
तमीज शेख, विमल वाडेकर,अलका डिडोरे, बेबी डिडोरे, मंगल धत्तींगे,अमृता जंगटे,उषा शेळके, नंदा देशमाने,ज्योती गायकवाड आदींनी केले.
जिल्हा परिषदसमोर झालेल्या सभेत युनियनच्या पुढाऱ्यासह आयटकचे कॉ.
अभय टाकसाळ,कॉ.राजू हिवराळे, पंचशीला धनेधर आदींची भाषणे झाली.
किरण जोशी मंगला पाटणकर अलका शोभा तांदळे, रफत सिद्दिकी, रंजना राठोड मीरा पालोदकर आरती नलावडे, वैशाली मकासरे वैशाली गायकवाड सुनिता शेजवळ, सुमन प्रधान, जयश्री खरात नीता खर्च अरुणा जाधव राष्ट्रीय रेड्डी शोभा पाखरे राजश्री प्रधान नीता विश्वासू जयश्री धीवरे, छाया पोटे अश्विनी थोरात, चारा खलसे ज्योती तांगडे जुबेदा पठाण प्रतिभा ढगे अरुणा शेळके जयश्री खराद आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह सुमारे दोन हजार अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.
राम बाहेती
अध्यक्ष