खामगाव :- नगर परीषद खामगांवच्या वतीने खामगांव शहरात राबविण्यात येत असलेल्या अतिक्रमण मोहिम स्तगित करणे बाबत.
नगर परीषद खामगांवच्या वतीने खामगांव शहरात अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे.या संदर्भात नगरपालिका प्रशासनाने ज्यांचे अतिक्रमण हटवायचे आहे त्या अतिक्रमण धारकांना नोटिसेस सुध्दा दिलेल्या आहेत तसेच पोलीस प्रोटेक्शन बंदोबस्ता सह सर्व आवश्यक बाबी ची तयारी केली आहे.परंतु ही अतिक्रमण हटविण्याची मोहीम ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला व शेतकरी बांधवांच्या शेती पेरणी पाण्याच्या हंगामाच्या सुरुवातीच्या सुमारास तर शाळकरी विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेच्या गडबडीच्या काळात राबविण्यात येत आहे.खामगाव शहरातील व खामगाव शहरालगत असलेल्या ग्रामीण परिसरातील अनेक बेरोजगार युवक आपल्या गरिबीच्या परिस्थितीवर व बेरोजगारीवर मात करून नातेवाईक मिञ मंडळी कडून उधार पाधार अर्थिक मदत घेऊन तसेच जवळची तुटपुंजी आर्थिक गुंतवणुक करून आप आपल्या परीने काही अपवादात्मक अतिक्रमण स्थळे वगळल्यास बऱ्याच मोठ्या प्रमाणातील अतिक्रमण धारकांनी

खामगाव :- नगर परीषद खामगांवच्या वतीने खामगांव शहरात राबविण्यात येत असलेल्या अतिक्रमण मोहिम स्तगित करणे बाबत.
अर्जदार :- स्वप्निल संजय ठाकरे अध्यक्ष खामगाव शहर काँग्रेस कमिटी,किशोर बाबासाहेब भोसले कार्याध्यक्ष खामगाव शहर काँग्रेस कमिटी.
आपणास या लेखी निवेदना द्वारे विनंति करीत आहे की आपल्या नगर परीषद खामगांवच्या वतीने खामगांव शहरात अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे.या संदर्भात नगरपालिका प्रशासनाने ज्यांचे अतिक्रमण हटवायचे आहे त्या अतिक्रमण धारकांना नोटिसेस सुध्दा दिलेल्या आहेत तसेच पोलीस प्रोटेक्शन बंदोबस्ता सह सर्व आवश्यक बाबी ची तयारी केली आहे.परंतु ही अतिक्रमण हटविण्याची मोहीम ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला व शेतकरी बांधवांच्या शेती पेरणी पाण्याच्या हंगामाच्या सुरुवातीच्या सुमारास तर शाळकरी विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेच्या गडबडीच्या काळात राबविण्यात येत आहे.खामगाव शहरातील व खामगाव शहरालगत असलेल्या ग्रामीण परिसरातील अनेक बेरोजगार युवक आपल्या गरिबीच्या परिस्थितीवर व बेरोजगारीवर मात करून नातेवाईक मिञ मंडळी कडून उधार पाधार अर्थिक मदत घेऊन तसेच जवळची तुटपुंजी आर्थिक गुंतवणुक करून आप आपल्या परीने काही अपवादात्मक अतिक्रमण स्थळे वगळल्यास बऱ्याच मोठ्या प्रमाणातील अतिक्रमण धारकांनी रहदारीस अडथळा निर्माण होवु न देता छोटा मोठा उद्योग व्यवसाय उभारून आप आपल्या परिवाराचा दैनंदिन उदरनिर्वाह करण्या करीता रोजगाराचे साधन तयार केले आहे.अशी सदृश्य परिस्थिती असल्याने ही अतिक्रमण मोहीम त्या अतिक्रमण धारकांच्या परिवारावर त्यांच्या रोजगारावर निर्दय तेचा व क्रूर तेचा हल्ला करणारा प्रकार ठरु शकते.आपण या अतिक्रमण धारकांचा व त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्याकरिता त्यांचा रोजगार नियमित सुरू राहावा याकरिता पर्यायी जागा उपलब्ध होई पर्यंत सहानुभूती पूर्वक विचार करून या अतिक्रमण मोहिमेला तूर्तास स्थगिती देऊन समस्त अतिक्रमण धारकांना सहकार्य करावे ही विनंती.
स्वप्निल संजय ठाकरे
अध्यक्ष
खामगाव शहर काँग्रेस कमिटी
किशोर बाबासाहेब भोसले
कार्याध्यक्ष
खामगाव शहर काँग्रेस कमिटी