सिल्लोड मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ मार्फत मंजूर करण्यात आलेल्या मुदत कर्ज योजनेच्या लाभार्थी यांना कर्जाची रक्कम वितरित करण्यासंदर्भात आज माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी मुंबई येथे अल्पसंख्याक विकास मंत्री ना.दत्ता मामा भरणे यांची भेट
मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व अल्पसंख्याक बोर्डाला बैठकीचे निर्देश देवून सदरील विषय तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याचे आदेश दिले. आमदार अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्यामुळे राज्यातील प्रलंबित कर्ज प्रकरणातील लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अल्पसंख्यांक विकास विभागातर्फे मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत वर्ष 2024-25 आणि 2025-26 अंतर्गत विविध योजनेचे कर्ज मंजूर करून मंजूरी पत्र देण्यात येऊन त्यांच्या सातबारा मिळकतीवर बोजा देखील चढविण्यात आलेला आहे, परंतु प्रत्यक्षात त्या लाभार्थीना कर्जाची रक्कम अद्याप देण्यात आली नसल्याने लाभार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत लाभार्थ्यांच्या वारंवार तक्रारी येत आहे. ही बाब आम
सिल्लोड मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ मार्फत मंजूर करण्यात आलेल्या मुदत कर्ज योजनेच्या लाभार्थी यांना कर्जाची रक्कम वितरित करण्यासंदर्भात आज माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी मुंबई येथे अल्पसंख्याक विकास मंत्री ना.दत्ता मामा भरणे यांची भेट घेवून याबाबत पाठपुरावा केला. त्यावर मंत्री दत्ता भरणे यांनी तातडीने दखल घेत मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व अल्पसंख्याक बोर्डाला बैठकीचे निर्देश देवून सदरील विषय तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याचे आदेश दिले. आमदार अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्यामुळे राज्यातील प्रलंबित कर्ज प्रकरणातील लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अल्पसंख्यांक विकास विभागातर्फे मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत वर्ष 2024-25 आणि 2025-26 अंतर्गत विविध योजनेचे कर्ज मंजूर करून मंजूरी पत्र देण्यात येऊन त्यांच्या सातबारा मिळकतीवर बोजा देखील चढविण्यात आलेला आहे, परंतु प्रत्यक्षात त्या लाभार्थीना कर्जाची रक्कम अद्याप देण्यात आली नसल्याने लाभार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत लाभार्थ्यांच्या वारंवार तक्रारी येत आहे. ही बाब आमदार अब्दुल सत्तार यांनी अल्पसंख्याक मंत्री ना. दत्ता भरणे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे वर्ष 2024-25 व 2025-26 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या मुदत व शैक्षणिक कर्जाची रक्कम लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी संबंधितांना आदेशीत करावे अशी मागणी आमदार अब्दुल सत्तार यांनी केली. याबाबतचे पत्र देखील त्यांनी मंत्री दत्ता भरणे यांना दिले.
यावर अल्पसंख्याक विकास मंत्री ना. दत्ता भरणे यांनी सकारात्मक दखल घेत संबंधित यंत्रणेला बैठकीचे निर्देश देवून सदरील विषय तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश अल्पसंख्याक विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
————-
मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत ज्यांचे कर्ज मंजूर होवून त्यांच्या सातबारा व मिळकतीवर बोजा चढविलेला आहे मात्र त्यांना अद्याप कर्जाचे वितरण झालेले नाही अशा लाभार्थ्यांना तातडीने कर्ज वितरणासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. आशा लाभार्थ्यांना लवकरच कर्ज पुरवठा होणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नये, दलालांपासून सावध रहावे – आमदार अब्दुल सत्तार