महत्वाचे

छत्रपती संभाजीनगर-माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त शेतकरी व नैसर्गिक आपत्तीने निधन झालेल्या शेतकऱ्यांना 34 लाखाचे धनादेश वाटप

18 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसांना प्रत्येकी एक लाख याप्रमाणे 18 लाख तसेच गेल्या आठवड्यात वीज पडून नैसर्गिक आपत्तीत चार जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख याप्रमाणे 16 लाख असे एकूण 34 लाख रुपयांच्या शासकीय मदतीच्या धनादेशाचे वाटप

प्रेस नोट

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.19, तालुक्यातील विविध ठिकाणी झालेल्या एकूण 18 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसांना प्रत्येकी एक लाख याप्रमाणे 18 लाख तसेच गेल्या आठवड्यात वीज पडून नैसर्गिक आपत्तीत चार जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख याप्रमाणे 16 लाख असे एकूण 34 लाख रुपयांच्या शासकीय मदतीच्या धनादेशाचे वाटप आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते येथील तहसील कार्यालयात करण्यात आले.

सिल्लोड तालुक्यातील योगेश ईश्वर सुळ – रहिमाबाद , सुखदेव यशवंत कळम – चिंचखेडा, रेवनाथ रघुनाथ जेठर जळकी, सतीश शामराव महाजन – भराडी, विश्वनाथ गंगाधर गंगाराम समिद्रे – सारोळा, नारायण विष्णू राकडे – कासोद, समाधान भीमराव भागवंत – डोईफोडा, जगन नामदेव मोठे – डीग्रस , सुनील भिका खरात – वांगी बु, आकाश संजय तांगडे – शिवना , रोहन जनार्दन वाघ – तळणी, लिंबाजी देवराव सोनवणे – चिंचखेडा, नाना तेजराव कोल्हे – केळगाव, शिवाजी केदारनाथ कालभिले- वाघेरा, गणेश मच्छिंद्र सुलताने – लोणवाडी, कृष्णा देविदास गुंजाळ – दहिगाव, कडूबा रामचंद्र काकडे – धानोरा तसेच कऱ्हाळा येथील रायसिंग लालसिंग बारवाल या शेतकऱ्यांनी सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. पीडित कुटुंबाला तातडीने शासकीय मदतीचा लाभ मिळवून देण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यासोबतच गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यात वीज पडून मोढा बुद्रुक येथील रंजना बाबुराव शिंदे , पिंपळदरी येथील शिवराज सतीश गव्हाणे तर सारोळा येथील रोहन राजू व यश राजू काकडे या सख्या भावांचा मृत्यू झाला होता. नैसर्गिक आपत्तीतील या पीडितांना तातडीने शासकीय मदत मिळावी यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी तहसीलदार यांना दिले होते. याबाबत आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्तिशः पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने आज शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे वारस स्वाती योगेश सुळ, सरला सुखदेव कळम, मीनाबाई रेवनाथ जेठर, शामराव कडुबा महाजन, यशोदाबाई विश्वनाथ समिंद्रे ,कल्याणी नारायण राकडे ,अर्चना समाधान भागवत ,आशाबाई जगन मोठे, वंदना सुनील खरात, सुवर्ण संजय तांगडे ,रेेखाबाई जनार्दन वाघ ,विमलबाई लिंबाजी सोनवणे, रुखमणबाई नाना कोल्हे, सरलाबाई शिवाजी कालभिले ,गीता गणेश सुलताने, कस्तुराबाई देविदास गुंजाळ, रूक्‍मानबाई कडूबा काकडे, आणि सुमनाबाई रायसिंग बारवाल यांना प्रत्येकी एक लाख याप्रमाणे तसेच वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या रंजना बाबुराव शिंदे यांचे वारस बाबुराव यशवंतराव शिंदे – मोढा बु. पिंपळदरी येथील मृत्युमुखी पडलेले शिवराज सतीश गव्हाणे यांचे वारस वर्षा शिवराज गव्हाणे यांना प्रत्येकी चार लाख तर रोहन राजीव काकडे व यश राजू काकडे या दोन सख्ख्या भावांचे वारस राधाबाई राजीव काकडे यांना आठ लाख रुपयांच्या शासकीय मदतीचे धनादेश आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

——-
याप्रसंगी आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांशी संवाद साधला , आत्महत्यामुळे घरातील कर्ता गेल्याने इतर सदस्य हवालदिल होतात. आत्महत्या हा काही अंतिम पर्याय नाही, शेतकऱ्यांच्या संकटात राज्य सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे . त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी आत्महत्या सारखे टोकाची भूमिका घेऊ नये असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी केले. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी तालुक्यात विविध उपाययोजना करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना दोन पिके घेता यावी यासाठी तालुक्यात सिंचन व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यात येत असल्याचे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले.
——

याप्रसंगी तहसीलदार सतिश सोनी, नायब तहसिलदार शेख हरून, नगर परिषदेचे मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, माजी जि प अध्यक्ष श्रीराम पा.महाजन ,माजी जि प उपाध्यक्ष केशवराव पा. तायडे, कृउबा समितीचे सभापती विश्वास दाभाडे ,शिवसेना तालुकाप्रमुख मारुती वराडे ,शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार ,शकुंतलाबाई बनसोड ,कृउबा समितीचे संचालक नंदकिशोर सहारे ,जयराम चिंचपुरे, दामू अण्णा गव्हाणे, रमेश लाठी, नानासाहेब रहाटे यांच्यासह संजय डमाळे, राजेंद्र ठोंबरे, शंकरराव खांडवे ,विठ्ठल सपकाळ, प्रशांत क्षीरसागर, मतीन देशमुख आदींची उपस्थिती होती.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.