महत्वाचे

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर व लोणार तालुक्यामध्ये ढग फुटी सदृश्य पाऊस

मेहकर तालुक्यातील जानेफळ परिसरात विशेषतः पावसाचा मोठा मारा झाला. गावालगतच्या नाल्याला पूर आला असून वरून आलेल्या पाण्यामुळे प्रसिद्ध शेगाव-पंढरपूर पालखी मार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. या मार्गावर गेले दोन तासांपासून पूर्ण बंद झाल्यामुळे यात्रेकरूंना व नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही भागांमध्ये घरात पाणी शिरल्याचेही समजते, त्यामुळे अन्नधान्य व घरगुती साहित्याचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. लोणार तालुक्यातील सुलतानपूर परिसरातही जोरदार पावसाचा कहर सुरू असून रस्ते व शेतजमिनी जलमय झाल्या आहेत. अनेक ठिकाणी विजेचा

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर आणि लोणार तालुक्यात काल (२५ जून) सायंकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून तो ढगफुटीसदृश स्वरूपात कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

शेतकऱ्यांनी नुकत्याच केल्या असलेल्या पेरण्या मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा अधिकृत अंदाज अद्याप हाती आलेला नाही.
मेहकर तालुक्यातील जानेफळ परिसरात विशेषतः पावसाचा मोठा मारा झाला. गावालगतच्या नाल्याला पूर आला असून वरून आलेल्या पाण्यामुळे प्रसिद्ध शेगाव-पंढरपूर पालखी मार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. या मार्गावर गेले दोन तासांपासून पूर्ण बंद झाल्यामुळे यात्रेकरूंना व नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही भागांमध्ये घरात पाणी शिरल्याचेही समजते, त्यामुळे अन्नधान्य व घरगुती साहित्याचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
लोणार तालुक्यातील सुलतानपूर परिसरातही जोरदार पावसाचा कहर सुरू असून रस्ते व शेतजमिनी जलमय झाल्या आहेत. अनेक ठिकाणी विजेचा पुरवठा खंडित झाला असून नागरिकांना सुरक्षिततेसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मेहकर उपविभागातील बोरखेडी तलावाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. तलाव ७५ टक्क्यांहून अधिक भरल्याने लवकरच सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पशुधन, शेतीची अवजारे आणि इतर आवश्यक साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणा सज्ज असून नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून पुढील काही तासांत अजून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.