छत्रपती संभाजीनगर -महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची पैठण तालुका कार्यकारणी घोषित..
महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या पैठण तालुकाध्यक्षपदी सिद्धार्थ सोनवणे आणि पैठण तालुका अल्पसंख्याक विभागाच्या तालुका अध्यक्षपदी इस्माईल शेख यांची नियुक्ती करण्यात आली तर पैठण तालुका संघटक पदी परमेश्वर सोनवणे यांची नियुक्ती करण्यात

महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची पैठण तालुका कार्यकारणी घोषित..
छत्रपती संभाजीनगर:
महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या पैठण तालुकाध्यक्षपदी सिद्धार्थ सोनवणे आणि पैठण तालुका अल्पसंख्याक विभागाच्या तालुका अध्यक्षपदी इस्माईल शेख यांची नियुक्ती करण्यात आली तर पैठण तालुका संघटक पदी परमेश्वर सोनवणे यांची नियुक्ती करण्यात
आली आहे.व पैठण तालुका उपाध्यक्षपदी राजेंद्र राजगुरू , पैठण शहर अध्यक्षपदी भानुदास चाबुकस्वार यांची नियुक्ती करण्यात आली,
महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल जी.वडमारे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.
महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी राहुल जी.वडमारे यांच्या अध्यक्षतेखाली पैठण येथील हॉटेल दुर्गा 29/06/2025 रोजी बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीत जिल्हाध्यक्ष राहुल वडमारे यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व उपस्थित पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी यांना येणाऱ्या काळात महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची बांधणी मजबूत कशी करायची गाव तेथे शाखा महाराष्ट्र पक्षाची झाली पाहिजे या सर्व बाबींवर सखोल चर्चा केली व या बैठकी दरम्यान या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल जी.वडमारे यांच्या हस्ते नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीची पत्रे देण्यात आली. यावेळी पक्षाचे जिल्हा सचिव बापूसाहेब चाबुकस्वार यांच्या हस्ते शाल व पुष्पहार टाकून सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती, जिल्हा संघटक रतन जाधव व ज्येष्ठ नेते महेंद्र गवई यांची होती बंडू तांदळे, कैलास साखरे, बाबासाहेब ससाने, प्रभाकर शहाराव,अनिल इंगळे, अमित देशमुख, मुकेश मकासारे, मनोज पगारे, विकास तायडे आदींची उपस्थिती होती.