महत्वाचे

छत्रपती संभाजीनगर-सर्वांगिण विकासासाठी पंचसूत्री कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी छत्रपती संभाजीनगर ,- बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येत असलेला बाल पंचसूत्री कार्यक्रम प्रभावीपणे राबवा. बालकामगार निर्मूलन ,बालभिक्षेकरी प्रतिबंध आणि शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण तसेच बालकांची आरोग्य तपासणी इ. मोहिमा राबवून हे अभियान पूर्णत्वास न्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

बालकामगार निर्मूलन ,बालभिक्षेकरी प्रतिबंध आणि शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण तसेच बालकांची आरोग्य तपासणी इ. मोहिमा राबवून हे अभियान पूर्णत्वास न्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले. जिल्हा महिला बालविकास अधिकारी रेशमा चीमंद्रे. जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी

सर्वांगिण विकासासाठी पंचसूत्री कार्यक्रम
प्रभावीपणे राबवावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

  • छत्रपती संभाजीनगर ,- बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येत असलेला बाल पंचसूत्री कार्यक्रम प्रभावीपणे राबवा. बालकामगार निर्मूलन ,बालभिक्षेकरी प्रतिबंध आणि शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण तसेच बालकांची आरोग्य तपासणी इ. मोहिमा राबवून हे अभियान पूर्णत्वास न्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.
    जिल्हा महिला बालविकास अधिकारी रेशमा चीमंद्रे. जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.दयानंद मोतीपवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, कामगार विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकन्या मुळे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश पुंगळे यांच्यासह बालविकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.
    शहरांमध्ये रस्त्यावर, सिग्नल आणि चौक महत्त्वाच्या ठिकाणी धाडसत्र राबवून बालभिक्षेकऱ्यांना बालगृहात प्रवेशित करून त्यांना आरोग्य व शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून पुनर्वसन करावे. जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रत्येक शाळेमध्ये बालकांच्या आरोग्य तपासणी करून घ्यावी. त्यांच्या आजाराचे निदान,औषधोपचार व मोठ्या आजाराचे निदान करण्यासाठी संदर्भित करावे. जिल्ह्यातील डॉक्टर्स,सामाजिक संस्था आणि प्रशासकीय यंत्रणेतील सर्व अधिकारी यांनी समन्वयाने ही मोहीम पूर्ण करावी. बालकांच्या हक्काबाबत सर्व विभागांमधून जाणीव जागृती व समाज माध्यमाचा वापर करून प्रत्येक संबंधित शासकीय विभागाने बालभिक्षेकरी ,बालकामगार आणि शाळाबाह्य मुलांना शाळेमध्ये प्रवेशित करण्यासाठीचे विशेष प्रयत्न करावेत. प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये बालस्नेही पोलीस कक्ष आणि नागरी भागामध्ये वाढ संरक्षण समिती तसेच ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीत ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करून कारवानी करण्याबाबतही महापालिका आणि जिल्हा परिषद यांना सूचित करण्यात आले उभारण्याबाबत यावेळी निर्देशित करण्यात आले. चाईल्ड हेल्प लाईन १०९८ आणि पोलिस विभागाच्या ११२ या क्रमांक वर हेल्पलाइन मार्फत बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी माहिती आणि तक्रार दाखल करण्यात नागरिकांनीही पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले.
    ०००००

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.