छत्रपती संभाजीनगर-सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बी. आर. गवई यांचे छत्रपती संभाजी नगर येथे आगमन व स्वागत
प्रशासनातर्फे विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी, न्या. नीरज धोटे, न्या. अभय वाघवले, न्या. रोहित जोशी, न्या. प्रफुल्ल खुबाळकर, न्या. संजय देशमुख, न्या. अरुण पेडणेकर, न्या. शैलेश ब्रह्मे, न्या. किशोर संत उपस्थित होते.

- *सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बी. आर. गवई यांचे छत्रपती संभाजी नगर येथे आगमन व स्वागत*
छत्रपती संभाजीनगर,-सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बी. आर. गवई यांचे आज सायं सव्वा सात वाजेच्या सुमारास येथील विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या सुविद्य पत्नी त्यांच्या समवेत होत्या.
प्रशासनातर्फे विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी, न्या. नीरज धोटे, न्या. अभय वाघवले, न्या. रोहित जोशी, न्या. प्रफुल्ल खुबाळकर, न्या. संजय देशमुख, न्या. अरुण पेडणेकर, न्या. शैलेश ब्रह्मे, न्या. किशोर संत उपस्थित होते.
तसेच विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आदी उपस्थित होते.